मुंबई

अलिबाग कारागृहात जनजागृती कार्यक्रम

CD

अलिबाग कारागृहात जनजागृती कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त हक्कांची जाणीव
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अलिबाग जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम बुधवारी (ता. १०) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कारागृहातील बंद्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे आणि संरक्षणाची हमी मिळवून देणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मानसी म्हात्रे यांनी मानवी हक्क दिन साजरा करण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यांनी बंद्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत, प्रतिष्ठेच्या हक्काबाबत, तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार योग्य पद्धतीने कुठे आणि कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तक्रार प्रक्रियेदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीचीही माहिती त्यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी मानवाधिकारांची व्याप्ती, कारागृहातील अडचणी आणि त्यावर मात करण्याचे मार्ग यावर प्रकाश टाकला. त्यांनी बंद्यांना समानतेचा हक्क, न्याय मिळवण्याचा अधिकार, तसेच कारागृह प्रशासनाशी संवाद साधताना कायदेशीर मर्यादा आणि हक्कांची स्पष्ट जाणीव ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा), महाराष्ट्र राज्य, पुणे – वारके (भा.पो.से.) तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह – दक्षिण विभाग) योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
...................
१७३ बंद्यांची उपस्थिती
या कार्यक्रमात एकूण १७३ बंदी उपस्थित होते. मानवी हक्कांबाबत अशी सखोल माहिती मिळाल्याने बंद्यांमध्ये जागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. बंद्यांच्या हितासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचा सूर उपस्थितांनी उमटवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT