मुंबई

नागाव परिसरात दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा शोध कायम

CD

दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा शोध कायम
नागाव परिसरात भीतीचे वातावरण, शाळांना सुट्टी
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः अलिबागजवळील नागाव येथील वर्तकवाडी परिसरात मंगळवारी सकाळी भरवस्तीत एका बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या बिबट्याने पाच जणांवर हल्ला केला. यानंतर अलिबाग-रोहा वन विभाग, रोहा पुणे येथील रेस्क्यू पथकाने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १०) शोध घेतल्यानंतरही बिबट्या सापडला नाही. त्यामुळे अलिबाग तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. बिबट्या सापडला नसल्याने नागावमधील शाळांना सुट्टी देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरले आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असूनदेखील येथे वन विभागाकडे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आवश्यक असणारी आधुनिक साधन सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
------
बिबट्या निघून गेला?
वन विभाग सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसर, तसेच आजूबाजूला शोध घेत होते, मात्र बिबट्या सापडला नाही. त्यामुळे तो या परिसरातून निघून गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
----
परिसरात अफवांचे पेव :
बिबट्या नागावमध्ये आल्याचे समजताच परिसरात अफवांचे पेव फुटले आहे. अनेक जणांनी दोन ते तीन बिबटे असल्याचा दावा केल्याने आणखीनच घबराट पसरली, मात्र वन विभाग आणि पोलिसांनी हा दावा खोडून काढला. त्याचप्रमाणे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-----
व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता :
सध्या हिवाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक दररोज येत आहेत. नागाव हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने डिसेंबर महिन्यापासून हजारो पर्यटक नागवला भेट देतात, मात्र आता बिबट्याचा वावर आणि त्यात तो अद्यापही सापडला नसल्याने याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT