मुंबई

रियाचा स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

CD

रियाचा स्केटिंगमध्ये विश्वविक्रम
तुर्भे,(बातमीदार) : ऐरोली येथील युरोस्कूलची विद्यार्थिनी रिया कुंदापूरने दोन चाकांच्या रोलर स्केटवर १०० मीटर अंतर अवघ्या २०.२२ सेकंदात पूर्ण करत सलग दुसरा गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला. काही वर्षांपूर्वी तिने इनलाइन स्केट्सवर ११.२१ सेकंदात पहिला विक्रम केला होता. रियाला तिच्या पालक, प्रशिक्षक आणि युरोस्कूलचा मजबूत पाठिंबा लाभला असून, प्राचार्या गीता अग्रवाल व रियाच्या आई रुपाली कुंदापूर यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले.
--------------------------------
घणसोलीतील हरिनाम सप्ताहाला सुरुवात
वाशी, (बातमीदार) : घणसोली सेक्टर १० येथील मेघमल्हार गृहसंकुलामध्ये सार्वजनिक उत्सव समितीतर्फे ११ ते १४ डिसेंबरदरम्यान हरिनाम सप्ताह, कीर्तन व प्रवचन महोत्सव असून, सप्ताहात दररोज काकड आरती, पारायण, प्रवचन, हरिकीर्तन आणि हरिजागर यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प. धनश्रीताई गणकर, सुधाकर महाराज वाघ, माधव महाराज रसाळ आणि ज्ञानेश्वर महाराज वाबळे कीर्तन सेवा देणार आहेत. तर ह.भ.प. पंडित महाराज वर्पे, ज्ञानराज महाराज म्हात्रे आणि हरिओम महाराज आवारे प्रवचन मार्गदर्शन करणार आहेत. भाविकांसाठी संतपूजन, संत पंगत व सांगता महोत्सवाचे विशेष आयोजन असून, आयोजकांनी अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर महागला! घरगुती ६० रुपयांनी तर कमर्शियल ११५ रुपयांनी वाढ

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT