मुंबई

दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीष दरोडा पोलीसांच्या ताब्यात

CD

हरीश दरोडा यांना अटक
शहापुरातील भातखरेदी घोटाळा प्रकरण
शहापूर, ता. १० (वार्ताहर) ः गोरगरिबांच्या कोट्यवधींच्या धान्यात अफरातफर करून फरार झालेला आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश उर्फ भाऊ दरोडा दोन वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरीशला शहापूरमधून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील साकडबाव केंद्रातील तब्बल पाच हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्याप्रकरणी हरीश दरोडा याच्यावर किन्हवली पोलिस ठाण्यात डिसेंबर २०२३ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुकताच अजित पवार गटात हरीश दरोडा याचा प्रवेश झाला होता. शहापूरचे आदिवासी विकास महामंडळ म्हणजे भातखरेदीतील भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत सुमारे १६ कोटींचा भातखरेदी घोटाळा उघडकीस आला आहे.
़़़़़़़
दीड कोटींचा घोटाळा
शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रातदेखील दीड कोटींचा भातखरेदी घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या व साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा, सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर, तसेच महामंडळाचे जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, तत्कालीन विपणन निरीक्षक समाधान नागरे यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या व बोगस चलन पावत्या बनवून शासनाची व आदिवासी विकास महामंडळाची सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

UPSC Success Marathi : अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मार्गदर्शनामुळे कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या ऋषिकेशने UPSC मध्ये ६१ वी रँक

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

SCROLL FOR NEXT