मुंबई

शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांची माघार

CD

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख बुधवारी (ता. १०) संपली. शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६ अ मधील अपक्ष उमेदवार रूपाली गेजगे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्ज मागे घेतला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निवडणूक कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ डिसेंबरला जाहीर केलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा, न्यायालयीन निर्णयांचा आणि २९ नोव्हेंबरच्या पत्रातील चार मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. हा सुधारित कार्यक्रम नगराध्यक्ष पदाबरोबरच प्रभाग क्रमांक २-ब, ३-ब, ४-अ, ४-ब, ४-क, ६-अ, ६-ब, ७-अ आणि ८-ब या प्रभागांसाठी लागू करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. आता गुरुवारी (ता. ११) निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, निवडणूक चिन्हांचाही वाटप केला जाणार आहे.
अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरवरून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यानंतर उमेदवारांमध्ये काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती. प्रचाराचे नियोजन, कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या हालचाली अधिकच तीव्र झाल्या होत्या. मात्र, नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल आठ महिला उमेदवार, तर २९ प्रभागांतील ५९ वार्डांसाठी एकूण २५९ उमेदवार रिंगणात कायम असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पुन्हा प्रचारयुद्ध
उद्याच्या चिन्हवाटपानंतर उमेदवार पुन्हा एकदा प्रचारयुद्धाला सज्ज होणार असून, घरोघरी भेटी, पदयात्रा, लहानमोठ्या सभा आणि बूथनिहाय संपर्क मोहिमा शहरात अधिक वेगाने सुरू होतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. निवडणूक वातावरणात पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला असून सर्वच उमेदवारांनी कंबर कसल्याचे चित्र आजपासून दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : डीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT