मुंबई

खेळाच्या मैदानात २,२०० खेळाडू

CD

खेळाच्या मैदानात २,२०० खेळाडू
आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव सुरू
तलासरी, ता. ११ (बातमीदार) ः आदिवासी विकास विभागांतर्गत डहाणू, तलासरी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ सवणे येथे उत्साहात झाला. यंदाच्या क्रीडा महोत्सवात तब्बल २,२०० खेळाडूंनी सहभाग घेतला असून आदिवासी कला, संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.
आदिवासी मुला-मुलींच्या स्पर्धात्मकता, शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हा क्रीडामहोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आदिवासी मुलांना खेळ, स्वास्थ्य, संस्कार करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. खेळाडूंसाठी निवास, भोजन, आरोग्य सुविधा, वाहतूक, तसेच मैदान व्यवस्थापनाची उत्कृष्ट आखणी करण्यात आली आहे. स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षे या तीन वयोगटांमध्ये होत असून ९ ते ११ डिसेंबर या तीन दिवसांत विविध गटांच्या क्रीडा प्रकारांचा थरार रंगणार आहे. या कार्यक्रमास डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे योगेश खंदारे, कार्यालयीन अधीक्षक जगदीश पाटील, संशोधन अधिकारी यदुनाथ भोये, निरीक्षक अमोल अहिरे, श्रीराम आंधळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT