आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप
मोखाडा (बातमीदार) ः तालुक्यातील केवनाळे, भवानीवाडी येथील आदिवासी कुटुंबांना, जीवदया ग्रुप ठाणे, समर्थ सामाजिक संस्था यांच्या वतीने धान्य किटचे वाटप करण्यात आले आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून हा उपक्रम करण्यात आला. गरीब गरजूंना धान्य किट, कपडे, ब्लँकेट अशा विविध वस्तूंची मदत केली आहे. अतिदुर्गम केवनाळे, भवानीवाडी येथील २०० हून अधिक गरीब आदिवासी कुटुंबांना धान्य किट वाटप केले. त्यामध्ये तेल, साखर, तूरडाळ, चणाडाळ, शेंगदाणे, चहा पावडर, रवा, गूळ, मैदा, पोहे आदी साहित्यांचा समावेश होता. यापूर्वी बोटोशी, बेलपाडा, नाशेरा, वाघ्याची वाडी, सावरपाडा, बोरशेती, करोळ, पाचघर, खोडाळा इंदिरानगर या गावपाड्यांत धान्याचे किट वाटले होते.