जनसेवा समितीचा हीरक महोत्सव
मालाड, ता. ११ (बातमीदार) ः समाजाची सेवा करण्यासाठी १९६५ मध्ये स्थापन झालेल्या मालाड येथील जनसेवा समितीने २०२५ मध्ये आपली ६० वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण केली आहे. वैद्यकीय शिबिरे, ग्रंथालय, मुलींसाठी महाविद्यालये आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम अशी उपक्रमे समितीने राबवली. संस्थेचे नेतृत्व अध्यक्ष डॉ. मोहनभाई आय. पटेल, उपाध्यक्ष डॉ. रंजन मणियार आणि निशा सागर चोप्रा यांच्याकडे आहे. १६ ते २३ डिसेंबरदरम्यान डॉ. मोहनभाई शैक्षणिक कॅम्पसमध्ये विविध उपक्रम पार पडणार आहेत.