भास्कर ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी रविवारी निवड चाचणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः क्रिकेट विश्वातील महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी १० ते १२ वर्षांच्या खेळाडूंसाठी निवड चाचणी रविवारी (ता. १४) कल्याणमध्ये होणार आहे. कल्याणच्या युनियन क्रिकेट अकॅडमी आणि भाटिया स्पोर्ट्स व मंगलोर स्पोर्ट्स क्लबतर्फे भास्कर ट्रॉफी निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. खेळाडूंनी आपल्या किटसह रविवारी सकाळी ७ वाजता युनियन क्रिकेट अकॅडमी, राजे संभाजी क्रीडांगण येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तुषार सोमाणी यांनी केले आहे.