भूतान येथील जलतरण स्पर्धेत कल्याणच्या नीता बोरसेंना सुवर्ण
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः भूतान येथील टीम्पू येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संयुक्त भारत खेळ फेडरेशनतर्फे भारताचे प्रतिनिधित्व नीता बोरसे यांनी केले. नीता बोरसे यांना जलतरण स्पर्धेत विविध अंतरात तीन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळवले.
नीता बोरसे एक गृहिणी असून विविध खेळांची आवड त्यांना आहे. नीता यांनी आपले घर सांभाळत जलतरण सराव केला असून विविध देशांमध्ये त्या खेळल्या आणि पदकेही मिळवली. बिर्ला कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर यज्ञेश्वर बागराव यांचे बोरसे यांना मार्गदर्शन लाभले. बिर्ला रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य दुबे यांनी नीता बोरसेंचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.