मुंबई

पनवेल आरटीओचा ‘दिरंगाईचा’ कारभार!

CD

पनवेल आरटीओचा ‘दिरंगाईचा’ कारभार!
लायसन्स चाचणीसाठी रोज दोन तास प्रतीक्षा; रोष तीव्र
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रात्यक्षिक चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी शेजारील रस्त्यावर दररोज दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची चाचणी घेतली जाते. ऑनलाइन पद्धतीने स्लॉट बुक करून सकाळी १० वाजता चाचणीची अधिकृत वेळ निश्चित असतानाही आरटीओ अधिकारी दीड ते दोन तास उशिरा पोहोचतात. या दिरंगाईमुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत.
चाचणी देण्यासाठी वेळ पाळून आलेले अनेक नागरिक उन्हात, रस्त्याच्या कडेला किंवा वाहनांजवळ उभे राहून अधिकाऱ्यांची वाट पाहात ताटकळत राहतात. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशीच चाचण्या घेतल्या जात असल्याने अनेकांना आपले कामाचे तास वाया घालवावे लागतात. वेळेत अधिकारी न आल्याने त्यांचे मानसिक त्रास, वेळेची नासाडी आणि आर्थिक नुकसान होत आहे.
‘ऑनलाइन स्लॉट घेतो, वेळ पाळतो… पण अधिकारी वेळ पाळत नाहीत,’ असा रोष नागरिक मोठ्या प्रमाणात व्यक्त करत आहेत.
दररोज वाढत चाललेल्या गैरसोयीमुळे आरटीओ विभागाविरोधात तीव्र नाराजी उसळली आहे. नागरिकांना शिस्त पाळण्यास सांगणाऱ्या परिवहन विभागाने स्वतः शिस्त लावून घेतली, तरच व्यवस्था सुधारेल, अशा कठोर शब्दांत नागरिकांकडून टीका होत आहे.

चौकट
परिणाम व मागणी :
नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, आरटीओच्या निष्काळजी आणि ढिसाळ कामकाजावर कठोर टीका करण्यात येत आहे. स्थानिकांनी तातडीने दिरंगाईवर बंदी घालावी आणि अधिकाऱ्यांनी निश्चित वेळेवर हजर राहावा, अशी काटेकोर मागणी केली आहे. तसेच, चाचणी प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त पाळण्याची व्यवस्था मजबूत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT