मुंबई

मालवणीत कचरा जाळून विल्हेवाट; धुरामुळे प्रदूषणात वाढ

CD

मालवणीत कचरा जाळून विल्हेवाट; धुरामुळे प्रदूषणात वाढ
मालाड, ता. ११ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक सहा येथील नवीन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा काही स्थानिक नागरिकांकडून जाळला जात आहे. त्यामुळे परिसरातील वायुप्रदूषणात वाढ होत असल्‍याचे रहिवाशांचे म्‍हणणे आहे.
नवीन रस्त्यावरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे; मात्र या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असल्याने तो जाळताना उठणारा धूर आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
मुंबईमध्ये आधीच वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना अशा प्रकारे कचरा जाळल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांकडून अशा उपायांकडे वळण्याची वेळ येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्लॅस्टिक जाळल्यामुळे हवेतील विषारी वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे श्वसनाचे त्रास, ॲलर्जी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात स्थानिक आणि पालिका यांच्यात समन्वयाची गरज तीव्रपणे जाणवते.
कचरा नियमित उचलणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT