मुंबई

टीजेएसबी सहकारी बँकेची एकशेत्रेसष्ठावी (१६३) शाखा उज्जैनमध्ये

CD

टीजेएसबी सहकारी बँकेचा मध्य प्रदेशात विस्तार
ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील देशातील चौथ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांत कार्यरत असलेल्या बहुराज्यीय टीजेएसबी सहकारी बँकेची मध्य प्रदेशातील दुसरी आणि एकूण १६३ वी शाखा उज्जैन येथे कार्यरत झाली आहे. बुधवारी (ता. १०) सुरू झालेल्या या नव्या शाखेत टीजेएसबीच्या सर्वसमावेशक बँकिंग सेवा उपलब्ध आहेत.
ठेवी योजना, रिटेल व एमएसएमई कर्जे, सोने तारण कर्ज, रेमिटन्स आणि फॉरेक्स सेवा, अत्याधुनिक डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म या माध्यमातून सर्व प्रकारच्या ग्राहकांना सुलभ आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा मिळणार आहेत. १६३व्या शाखेच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी आणि महाव्यवस्थापक विनायक गोरे उपस्थित होते. उज्जैन येथील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
उद्‍घाटनप्रसंगी बोलताना अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, उज्जैन येथील टीजेएसबीची शाखा ही मध्य प्रदेशातील दुसरी शाखा आहे. उज्जैन हे सांस्कृतिक महत्त्व आणि आर्थिक क्षमता असलेले शहर आहे. आमचा येथील प्रवेश हा महत्त्वाच्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये टीजेएसबीची उपस्थिती अधिक सक्षम करणारा ठरेल. या भागातील नागरिकांशी दृढ नाते निर्माण करून विश्वासपूर्ण व्यावसायिक सेवा देण्यासाठी आपली बँक कटिबद्ध आहे.

टीजेएसबी सहकारी बँकेविषयी
१९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक ही भारतातील अग्रगण्य बहुराज्यीय सहकारी बँक आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बँकेचे प्रभावी कामकाज आहे. एकूण १६३ शाखांसह राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन शाखा सुरू करण्याचे योजिले आहे. नागरी सहकारी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीजेएसबी बँकेकडून बचत व चालू खाती, मुदत ठेवी, रिटेल व एमएसएमई कर्जे, सोने तारण कर्ज, फॉरेक्स आणि रेमिटन्स आदी विविध आर्थिक सेवा पुरवल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT