कामगारांच्या हक्कांसाठी लढा
कामगार नेते राजीव पाटील यांचे प्रतिपादन
वसई, ता. ११ (बातमीदार)ः संघटना चालवणे हा उद्देश नसून कामगारांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. परिवहन सेवेचे कर्मचारी नागरिकांना सेवा देत असतात. त्यांच्या कामाची पोचपावती मिळायला हवी, असे कामगार नेते तथा माजी महापौर राजीव पाटील यांनी केले.
स्थानिक कामगार संघ, स्थानिक प्रवासी, मालवाहतूक चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या फलकाचे उद्घघाटन करण्यात आले. वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागावर कामगार संघटनेत कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक, संघटनेचे महासचिव सुनील आचोळकर, माजी परिवहन सभापती प्रितेश पाटील, सचिव सचिन वैद्य, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन विभागाकडून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, कायद्यातील तरतुदीनुसार वेतन मिळावे, ग्रॅच्युईटी मिळावी, वार्षिक सुट्ट्यांची यादी फलकावर लावण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.