मुंबई

कोशिंबळेत प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान

CD

कोशिंबळेत प्लॅस्टिकमुक्त स्वच्छता अभियान
महिला मंडळ आणि ग्रामविकास कमिटीचा उपक्रम
माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील तळे-कोशिंबळे गावात ग्रामविकास कमिटी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिकमुक्त स्वच्छता अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावभर विखुरलेला प्लॅस्टिक आणि इतर कचरा गोळा करून मोठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गावाचे वातावरण स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त झाले असून, सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या मोहिमेला समाजसेवक विजय दादा यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी घराघरातील तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील प्लॅस्टिक कचरा गोळा करत स्वच्छतेचे काम जलद गतीने पूर्ण केले. यशवंत बक्कम, बापू बक्कम, सुभाष शिंदे आणि प्रदीप बक्कम यांनीही सक्रिय सहभाग देत उपक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
गावातील महिला मंडळांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. महिलांच्या सहभागामुळे अभियान अधिक प्रभावी बनले आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली. मोहिमेनंतर गावात प्रत्यक्ष प्लॅस्टिकमुक्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ग्रामविकास कमिटीने भविष्यातही अशाच उपयुक्त आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे गावाच्या स्वच्छतेसाठी आणि संरक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT