मुंबई

वालधुनी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात....

CD

वालधुनी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात
कल्याणकरांचे वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ संपता संपेना
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : शहाड, धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीपाठोपाठ आता नेताजी सुभाषचंद्र बोस (वालधुनी) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पूल १५ डिसेंबरपासून २० दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यास नवीन वर्ष उजाडणार असल्याने सरत्या वर्षातही कल्याण-डोंबिवलीकरांच्या मानगुटीवर वाहतूक कोंडीचे भूत बसणार आहे.
कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बाईचा पुतळाजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस उड्डाणपुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या पुलाची आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी करून दुरुस्तीचे निर्देश दिले होते. यानुसार पालिका प्रशासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या बेरिंग रिपेरिंगचे काम झाले असून, उड्डाणपुलाच्या रस्त्याचे जुने डांबर काढण्याचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यासाठी १५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत २० दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यासाठी वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाकडून सूचना अद्यापही काढण्यात आली नसली तरी येत्या दोन दिवसांत वाहतूक पोलिसांकडून वाहतूक वळविण्याची सूचना काढली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT