मुंबई

सोमजादेवी रथसोहळ्याची भक्तिमय सांगता

CD

सोमजादेवी रथसोहळ्याची भक्तिमय सांगता
श्रीवर्धनमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर पारंपरिक सोहळा
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : श्रीवर्धन येथील जागृत देवस्थान श्री सोमजादेवी यांचा वार्षिक रथ उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक भाविकांनी रथमार्गावर फुलांची आकर्षक आरास व रांगोळी साकारून संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. विशेष म्हणजे, यंदा तब्बल दोन टन सातशे किलो फुलांच्या पाकळ्यांनी रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली, ज्यामुळे हा उत्सव सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री सोमजादेवीचा रथ उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा व दत्त जयंतीनंतर कृष्ण प्रतिपदेपासून सप्ताहाच्या स्वरूपात साजरा केला जातो. याच परंपरेनुसार शनिवारी (ता. १३) मध्यरात्री सोमजादेवी मंदिरातून रथ उत्सवाला प्रारंभ झाला. टिळक रस्ता, मेटकर्णी मंदिर, कुंभारवाडा, कसबा पेठ, गुरव आळी, गणेश मंदिर या प्रमुख मार्गांवरून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या जयघोषात व देवीच्या नामस्मरणात रथ पुन्हा सोमजादेवी मंदिरात पोहोचला. रविवारी (ता. १४) मध्यान्ही धार्मिक विधी व आरतीनंतर रथ उत्सव सोहळ्याची सांगता झाली. रथ ज्या मार्गाने मार्गस्थ झाला, त्या संपूर्ण मार्गावर भाविकांनी झेंडू, जरबेरा, शेवंती, ॲस्टर, गुलछडी व गुलाब अशा विविध फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर रांगोळी काढली होती. रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधाने व नक्षीदार रांगोळीने रस्ते अक्षरशः फुलून गेले होते. या भव्य सजावटीसाठी आवश्यक असलेली फुले पुणे येथील फुलबाजारातून खरेदी करण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह संचारला होता. परंपरा, श्रद्धा आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन या रथ उत्सवातून घडले, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT