मुंबई

खासगी शाळेतील मुलांच्या आरोग्याशी खेळ

CD

खासगी शाळेतील मुलांच्या आरोग्याशी खेळ
बाथरूमला गटाराचे पाणी
सकाळ वृत्तसेवा, ठाणे

ठाणे, ता. १५ : दिव्यातील मातोश्रीनगर येथील एका खासगी शाळेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळला जात असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ड्यू ड्रॉप नावाच्या शाळेत पाण्याची मोटार लावून चक्क गटाराचे पाणी विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये वापरायला दिले जात होते. काही पालकांनी दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे शाळेत गटाराचे पाणी वापरले जात असल्याची तक्रार केली.

तक्रारीची खात्री करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) शाळेला भेट दिली. त्या वेळी ही धक्कादायक बाब उघड झाली. भावी पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने या घटनेचे व्हिडिओ पुरावे ठाणे महापालिकेच्य शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिले. उपायुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पाहणीसाठी शिक्षण विभागाचे पथक पाठवत असल्याचे सांगितले.

मनसेने शिक्षण विभागाने संबंधित शाळेची मान्यता रद्द करून मुलांना दुसऱ्या शाळेत न्यावे, अशी मागणी केली आहे. मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी माहिती दिली की, शनिवार आणि रविवार असल्याने शिक्षण विभागाने काय कारवाई केली, याची विचारणा महापालिकेत जाऊन केली जाईल. या वेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, उपशाध्यक्ष जितेंद्र गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकांच्या तक्रारीनुसार पाहणी केल्यावर धक्कादायक बाब पुढे आली. तातडीने ते व्हिडिओ ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यात आल्यावर शिक्षण विभागाने पाहणी केली; मात्र शनिवार आणि रविवार असल्याने काय कारवाई केली. याबाबत सोमवारी शिक्षण विभागाकडे विचारणा केली जाणार आहे. तसेच पोलिसांनाही निवेदन देत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT