मुंबई

मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची नजर

CD

१.८६ कोटींचे गोवा बनावटीचे मद्य जप्त!
ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका
ठाणे, ता. १६ : नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीवर कडक नजर ठेवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश आले आहे. ठाण्यात गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पकडून विभागाने एक कोटी ८२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सोमवारी (ता. १५) सकाळी ९. ४० च्या सुमारास महापे ते ठाणे मार्गावर गस्त वाढवली होती. संशयास्पद वाटणारा पांढऱ्या रंगाचा सहाचाकी टेम्पो (क्र. केए -०९-एबी-१०८७) अडवून तपासणी केली असता, त्यात मद्याचा मोठा साठा आढळला. निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर. महाले, एस.आर. मिसाळ, बी.जी. थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात भागीरथराम हिराराम गोदारा या वाहनचालकाला अटक केली आहे.

ठाणे ‘ट्रान्झिट पॉइंट’ असल्याचा संशय
ठाणे शहर हे मुंबई, गुजरात आणि पालघरला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने, परराज्यातून येणाऱ्या मद्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हा पुरवठा वाढण्याची शक्यता गृहीत धरून विभागाने जिल्ह्याभरात खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले आहे.

कारवाईचे तपशील
जप्त मद्य : १५५० पेट्या (परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य).
एकूण किंमत: एक कोटी ८२ लाख २६ हजार ५०० रुपये (मद्य व वाहन मिळून).

नाताळ आणि नववर्षाच्या काळात अनधिकृत मद्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके तैनात आहेत. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
- प्रवीण तांबे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT