मुंबई

डहाणू तालुक्यात आंबेसरीत ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’चा जागर

CD

२२० जणांचे रक्तदान
आंबेसरीत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे शिबिर

कासा, ता. १६ (बातमीदार) : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, आंबेसरी येथे रक्तदान शिबिर पार पडले. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २२० जणांनी या वेळी रक्तदान केले.
शिबिराचे उद्‌घाटन आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच गीता, शिबिराचे संयोजक रामजी खांनजोडे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी व सेवाभावी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात आंबेसरी शाखेचे दिलीप हाडळ, वेवजी शाखेचे काशिनाथ डोल्हारे, हळदपाडा शाखेचे सुभाष हांडवा यांच्या नेतृत्वाखाली तीनही शाखांनी सक्रिय सहभाग नोंदवला. रक्तसंकलनासाठी वलसाड येथील पथक आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सिल्वासा यांच्या दोन स्वतंत्र वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी एकूण ३१६ जणांनी रक्तदानासाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २२० जणांनी रक्तदान केले. वैद्यकीय कारणांमुळे ९६ अर्ज नाकारण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT