मुंबई

वाढवण बंदरावरून जनरोष

CD

वाढवण बंदरावरून जनरोष
रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
डहाणू, ता. १६ (बातमीदार)ः वाढवण बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागेचे शासनामार्फत सीमांकन करण्यात आले आहे, मात्र भूसंपादन करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत जागेवरची अनेक झाडे तोडून, सपाटीकरण केलेल्या जागेवरील भरावाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
वाढवण बंदरासाठी केंद्र सरकारच्या २९ ऑगस्ट २०२५ च्या अधिसूचनेप्रमाणे जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांनी २२ गावातील सरकारी, खासगी आणि वन जमिनीचे मोजमाप करून रस्त्यांचे सीमांकन निश्चित केले आहे. सीमांकनात झाडांचे मूल्यमापन करण्यात आले आहे, पण त्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. असे असताना वरोर येथील सीमांकन झालेल्या जागेत अनेक झाडे तोडली आहेत, शिवाय पोलिस संरक्षणात जमिनींचे सपाटीकरण सुरू असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
------------------------
पोलिसांबरोबर बाचाबाची
जेएनपीएच्या ठेकेदारांनी रस्ता बनवण्यासाठी पोलिस संरक्षणात दगड, मुरमाने भरलेले अनेक डम्पर आणल्याचा सुगावा लागताच शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या वेळी बेकायदेशीर कामाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांबरोबर शाब्दिक चकमक झाली. यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते घटनास्थळी आल्याने आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT