मुंबई

कल्याणमधील काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?

CD

काँग्रेसचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?
कल्याणमधील पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच कल्याणमधील काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आणि नेता शिंदे गटात बुधवारी (ता. १६) प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून हा गट शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुप्त भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती. हवे तसे वजन मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला होता. मात्र, अखेर आता हा गट शिंदे गटात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहेत.
महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाने इतर व एकमेकांच्या पक्षातील नाराज माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नाराज गटाला देखील आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात काहीशी रस्सीखेच सुरू होती. डोंबिवलीमधील काँग्रेसचे पदाधिकारी भाजपने गळाला लावले असतानाच शिंदे गटाने कल्याणमधील काँग्रेसच्या नेत्याला आपल्या जाळ्यात ओढले आहे.
काँग्रेस मधील हा नेता गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात होता. यानंतर नोव्हेंबर महिन्यात जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत या नेत्याने आपली नाराजी उघड केली होती. त्याचवेळी तो शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिंदे गटातील काही गणित जुळत नसल्याने त्यांनी प्रवेश केला नसल्याचे बोलले जात होते. दरम्यानच्या काळात ते अन्य पक्षात जाऊ नये म्हणून पक्षाने त्यांना कल्याण-डोंबिवली पालिका प्रचार प्रमुख पद देऊ केले. मात्र, सोमवारी (ता. १६) या नेत्याने पक्षातील सदस्य पदाचा आणि प्रचार प्रमुख पदाचा राजीनामा वरिष्ठाकडे दिला आहे. यामुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १७) प्रवेश होण्याची शक्यता आहे. या गटासह इतर काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने देखील या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे.

भाजपही प्रयत्नशील
विशेष बाब म्हणजे, हा गट भाजपमध्ये दाखल व्हावा यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतेही मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील होते. विविध आश्वासनांद्वारे या गटाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अखेर बाजी शिंदे गटाने मारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट या पक्ष प्रवेशाची तयारी करत असताना दुसरीकडे भाजपा देखील बुधवारी काही पक्ष प्रवेशाची तयारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT