मुंबई

भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात

CD

भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात
१२ नगरसेवकपदांसाठी सुमारे ५० इच्छुक; उमेदवारीवरून कार्यकर्त्यांत उत्सुकता
खारघर, ता. १६ (बातमीदार) : पालिका निवडणुकीची घोषणा होताच भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सोमवारपासून सुरुवात झाली आहे. खारघरमधील तीन प्रभागांतून एकूण १२ नगरसेवकपदांसाठी जवळपास ५० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांसह स्थानिक मतदारांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर भाजप नेतृत्वाने उमेदवार निवड प्रक्रियेला गती दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच महापालिका निवडणुकीत खारघरमधील तीनही प्रभागांतून भाजपचे १२ नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्या वेळी मोदी लाटेचा लाभ भाजपला मिळाला होता, मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली असून, शेकापसह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा उमेदवारीसाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. खारघर हा उच्चशिक्षित आणि जागरूक मतदारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर जनहिताची कामे, मतदारांशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि स्वच्छ प्रतिमा या निकषांवर उमेदवारांची चाचपणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गाव आणि कॉलनी या दोन्ही घटकांचा समतोल साधत योग्य उमेदवार देण्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
.............
दरम्यान, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या कॉलनी फोरमच्या लीना गरड यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट)मध्ये प्रवेश केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील पाच वर्षांत मालमत्ता कराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या कॉलनी फोरमचे काही उमेदवार ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॉलनी फोरमविरोधात तगडे उमेदवार देण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...................
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक १ ते ६ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. खारघरमधील तीन प्रभागांतील १२ नगरसेवकपदांसाठी सुमारे ५० इच्छुकांनी हजेरी लावली. मुलाखतीदरम्यान आर्थिक बाजूवर भर दिला जात असल्याचे काही इच्छुकांनी सांगितले. पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा आर्थिक क्षमता निकष ठरल्यास धनदांडग्यांनाच उमेदवारी मिळण्याचे चित्र निर्माण होऊ शकते, अशी भावना काहींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT