मुंबई

कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा

CD

कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा

मुंबई, ता १६ : मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त, धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी कै. गंगाराम गव्हाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गव्हाणकर फॅन क्लब आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांसाठी खुली आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जिल्हावार वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राथमिक फेरी ३ जानेवारी २०२६, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी संयुक्त प्राथमिक फेरी १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १६ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. या भागांतील हौशी व व्यावसायिक रंगकर्मी, नवोदित कलाकार तसेच लेखक-दिग्दर्शक यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्थानिक बोलींचे संवर्धन आणि सामाजिक जाणिवांचे कलात्मक रूपांतर हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT