मुंबई

शिक्षणाबरोबर खेळ कलेची जोड असावी.

CD

शिक्षणाबरोबर खेळ कलेची जोड असावी ः गुलाबराव पाटील
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) ः येथे जपानी शोतोकाम कराटे डो-फेडरेशनच्या वतीने आठव्या राष्ट्रीय कराटे डो चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्‍घाटनाप्रसंगी राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, जापानी शोतोकाम कराटे डो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र कोरी आणि पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्टचे अध्यक्ष पी.टी. धनविजय उपस्थित होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, कराटे खेळामुळे आपले स्व-संरक्षण होते. शिक्षणाबरोबर खेळाची जोड असेल तर नक्कीच जीवनात आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील १६० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील महेश नवले सायन यांच्या ग्रुपचा प्रथम क्रमांक, वसंत गावकर व हेमंत धोत्रे यांच्या ग्रुपचा द्वितीय क्रमांक आणि योगेश पानसरे यांच्या ग्रुपचा तृतीय क्रमांक आला. पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र कोरी यांना पंच फिरोज पठाण, जॉय थॉमस, धरमदास सामंत, अग्निश पाटणकर आणि आशिष ढोले यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT