मुंबई

पनवेलमधील अवैध जाहिरातींना लगाम

CD

पनवेलमधील अवैध जाहिरातींना लगाम
आचारसंहिता लागू होताच पनवेल पालिकेची धडक कारवाई
पनवेल, ता. १६ (बातमीदार) : निवडणूक आचारसंहिता लागू होताच पनवेल महापालिकेने शहरातील अवैध होल्डिंग, बॅनर व फ्लेक्स हटवण्यासाठी तातडीची आणि प्रभावी मोहीम हाती घेतली. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, तसेच शहराचे सौंदर्य व वाहतुकीची शिस्त अबाधित रहावी, या उद्देशाने पालिकेने रात्री उशिरापर्यंत विविध भागांत धडक कारवाई केली. या कारवाईमुळे पनवेल शहर अधिक स्वच्छ, मोकळे व देखणे दिसू लागले आहे.
गेल्या काही महिन्यांत शहर व उपनगरांमध्ये अवैध जाहिरातींचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला होता. रस्त्यांच्या दुतर्फा, चौकांमध्ये, उड्डाणपुलांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत होत्या. यासोबतच शहराच्या सौंदर्यावरही या जाहिरातींमुळे विपरीत परिणाम होत होता. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाईला सुरुवात करत विविध प्रभागांमध्ये अवैध होल्डिंग हटवले. काही प्रमुख चौक, मुख्य रस्ते व उड्डाणपुलांवरून मोठ्या प्रमाणावर बॅनर व फ्लेक्स काढण्यात आले. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
...............
दंडात्मक कारवाई होणार
पालिकेने यापुढेही अवैध जाहिराती लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले. ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याने नागरिकांकडून पालिकेच्या या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. शहर स्वच्छ, शिस्तबद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT