मुंबई

शिरवणे मार्गावरील गतिरोधक तुटल्याने अपघाताचा धोका

CD

शिरवणे मार्गावरील गतिरोधक तुटल्याने अपघाताचा धोका
जुईनगर, ता. १६ (बातमीदार): जुईनगर येथील सेक्टर २४ मधील स्वयंभू गणेश मंदिर समोरील रस्त्यावरील गतिरोधक तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून नेरूळ व जुईनगर परिसरातून सेक्टर १ शिरवणे तसेच आजूबाजूच्या लघुउद्योग भागात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.
याच रस्त्यावरून जुईनगर कॉन्व्हेंट, अमृता विद्यालय तसेच पूर्व भागातील सेंट झेविअर्स स्कूल आणि सेंट अगस्तीन स्कूल येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची नियमित ये-जा सुरू असते. रस्ता अरुंद असून दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने अनेकदा येथे वाहतूक कोंडीही होते.
अशा परिस्थितीत गतिरोधक तुटल्याने वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात मंदिर, शाळा, उद्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र असल्याने दिवसरात्र नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे येथे गतिरोधक असणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गतिरोधक दुरुस्त न झाल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या ठिकाणचा गतिरोधक दुरुस्त करावा अथवा नवीन गतिरोधक उभारावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

SCROLL FOR NEXT