मुंबई

रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिलेला रिक्षाची धडक

CD

अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना रिक्षाचालकाच्या निष्काळजीमुळे ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला अपघाताला सामोरे जावे लागले. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून, डाव्या हाताच्या कोपऱ्याला फॅक्चर झाले आहे. तसेच, डोक्याला व पायाला गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील डिफेन्स कॉलनी परिसरात राहणाऱ्या राणी चिंडालिया या ९ डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास पतीसोबत अंबरनाथ स्थानक परिसरातील डॉक्टरांकडे उपचार घेऊन पायी घरी परतत होत्या. जठार हॉस्पिटलसमोर भरधाव आलेल्या रिक्षाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांना जोरदार धडक दिली. यात चिंडालिया यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर मुका मार लागला आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सोमवारी त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक साळवे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT