मुंबई

''अडलंय का'' बालनाट्य अव्वल

CD

‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल
रविकिरण संस्थेची स्पर्धा


मुंबई, ता. १६ : सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या दोन दिवसांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या सेक्रेड हार्ट स्कूलचे ‘अडलंय का’ हे बालनाट्य अव्वल ठरले.
सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय अभिनेत्री या पुस्कारांवर ‘दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान’च्या ‘दिव्याखाली दौलत’ने नाव कोरले, तर सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान मुक्तछंद नाट्य संस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ला मिळाले. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सर्कस या बालनाट्यास स्पेशल ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले शाळेच्या ‘रे क्षणा’ने, तर दुसरे उत्तेजनार्थ ‘संदेश विद्यालय, पार्क साईट’च्या ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ने पटकावले. स्पर्धेत अत्यंत तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये रंगतदार चुरस झाली.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री पूर्वा पवार, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक, निवेदक, कलादिग्दर्शक नंदकुमार परशुराम पाटील यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली.
रविकिरणची बालनाट्य स्पर्धा असो किंवा समाजाभिमुख उपक्रम; ही परंपरा आमची तरुण पिढी आगामी काळातही निष्ठेने, उत्साहाने आणि नवचैतन्याने पुढे नेत आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे रविकिरण मंडळाचे अध्यक्ष नागेश वांद्रे म्हणाले.


सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

रविकिरण मंडळाची ही स्पर्धा यंदा मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लाल मातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट, अपहृत तरुणी प्रियकरासोबत मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर झाली पण...

Shivam Dube: ‘खरा अष्टपैलू’ होण्याचा निर्धार; शिवम दुबेचा षटकारांसह गोलंदाजीत दमदार संदेश!

Viral Video: मृत्यू दारात उभा होता! क्षणभर उशीर झाला असता तर… आईच्या धाडसामुळे दोन चिमुकल्यांचे वाचले प्राण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Solapur Temperature: सोलापूरचा पारा ३५.३ अंशांवर; उन्हाचा चटका वाढू लागला, किमान तापमानातही वाढ, हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

Kolhapur Municipal Corporation : गुंठेवारी प्रस्तावांसाठी तीन महिने मुदतवाढ? कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहाची पहिली सभा गाजणार

SCROLL FOR NEXT