मुंबई

कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर शाळेत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न

CD

नूतन शाळेत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग समूह साधन केंद्र क्रमांक चारअंतर्गत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन नूतन ज्ञान मंदिर येथे उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विद्यामंदिरच्या माजी प्रभारी मुख्याध्यापिका ललिता मोरे आणि सीआर वालधुनीचे केंद्रप्रमुख सुभाष गंभीरे यांनी हजेरी लावली होती.
नूतन ज्ञानमंदिर या शाळेच्या सभागृहात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी भारत बोरनारे व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरसी प्रमुख भगवान हमरे आणि नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक मुख्याध्यापक रमाकांत पाटील व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ललिता मोरे यांनी आपल्या भाषणातून विज्ञान प्रदर्शन का भरवण्यात येते हे स्पष्ट केले. विज्ञान प्रदर्शनात एकूण १६ शाळांनी सहभाग नोंदवला होता. हे प्रदर्शन निरीक्षणाचा अनेक शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह लाभ घेतला. लोखंडे व ललिता मोरे यांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे परीक्षण केले. सई जाधव आणि पलक तळले यांच्या संरक्षक वाहतुकीचे मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर गणेश विद्यामंदिर शाळेचे रघुनाथ कोळी आणि रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अनंता कालेकर आणि सोहम खंदारे यांनी पाण्याचे व्यवस्थापनास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

SCROLL FOR NEXT