मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

CD

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
बसमध्ये विसरलेली ८५ हजारांची रोकड प्रवाशाला केली परत

ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : ‘लालपरी’चे कर्मचारी आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ठाणे-शिर्डी बसमध्ये एक प्रवासी आपली ८५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग विसरला होता; मात्र बसमधील वाहक आणि चालकाने तत्परता दाखवत ही रक्कम प्रवाशाला सुखरूप परत केली आहे. योगेश्वर कोळी (वाहक) आणि योगेश साबळे (चालक) असे या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

ठाणे खोपट आगार क्रमांक १ मधून १७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शिर्डीसाठी बस रवाना झाली होती. या बसमधून रोशन बाफना हे प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्या बॅगेत ८५ हजार रुपयांची रोकड होती. दुपारी १२ च्या सुमारास बस शिर्डी आगारात पोहोचली असता, बाफना घाईघाईत बसमधून उतरले आणि पैशांची बॅग विसरून थेट रेल्वे स्थानकाकडे निघून गेले. सर्व प्रवासी उतरल्यानंतर वाहक योगेश्वर कोळी यांनी बसची पाहणी केली असता त्यांना ही बेवारस बॅग आढळली. त्यांनी तत्काळ ही बाब चालक योगेश साबळे यांच्या निदर्शनास आणून दिली. दोघांनीही ती बॅग शिर्डी बस स्थानक प्रमुख नानासाहेब आहेर आणि वाहतूक नियंत्रक सचिन सोमवंशी यांच्याकडे सुपूर्द केली. आगारात सर्वांसमोर बॅग तपासली असता, त्यामध्ये रोख ८५ हजार रुपये आणि एक व्हिजिटिंग कार्ड सापडले. त्या कार्डावरील क्रमांकावर संपर्क साधला असता, ती बॅग रोशन बाफना यांची असल्याचे स्पष्ट झाले.

प्रवाशाने मानले आभार
एसटी आगारातून फोन आल्यावर बाफना तातडीने बस स्थानकावर पोहोचले. आवश्यक ओळख पटल्यानंतर त्यांची बॅग त्यांना सुपूर्द करण्यात आली. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने बाफना यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे तोंडभरून कौतुक केले आणि सर्वांचे आभार मानले. एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कोळी आणि साबळे या दोघांचा गौरव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT