मुंबई

मोखाड्यात नरेद्र महाराजांच्या पादुका दर्शन सोहळा

CD

मोखाड्यात नरेंद्र महाराजांचा पादुका दर्शन सोहळा
मोखाडा, ता. १८ (बातमीदार) ः जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा रविवारी (ता. २१) मोखाडा येथे मोठ्या उत्साहात होणार आहे. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून प्रशासकीय व सामाजिक जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ढोल-ताशे, लेझीम पथके, कलशधारी महिला आणि सजीव देखाव्यांच्या उपस्थितीत श्रींच्या प्रतीकात्मक पादुकांची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर वेदमंत्रोच्चारात पादुकापूजन होईल. संस्थानतर्फे दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत २१ गरजू महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. सोहळ्यात विशेष प्रवचन, गुरुपूजन, आरती आणि उपासक दीक्षा विधी पार पडतील. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, आरोग्यसेवादेखील तैनात असेल.
जिल्हा अध्यात्मप्रमुख दिगंबर पाटील आणि स्थानिक नियोजन समितीने सर्व भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT