मुंबई

आगरी कोळी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

CD

आगरी कोळी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
विरार, ता. १८ (बातमीदार) : वसई-विरारमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगरी कोळी सेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष भूपेश कडूळकर, वसई तालुका अध्यक्ष जयेश पाटील, सचिव दिनेश सावंत, प्रथमेश सुर्वे आणि चेतन हांडू यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशामुळे वसई-विरार परिसरात भाजपचे संघटनात्मक बळ वाढणार असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आगरी कोळी समाजाच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी हे सर्व सहकारी भाजपच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करतील, असे मत स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हा संयोजक सिद्धेश तावडे, मयंक शेठ, गोपी मेनन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT