मुंबई

उल्हासनगरचा कुख्यात गुंड जेरबंद

CD

उल्हासनगरचा कुख्यात गुंड जेरबंद
एमपीडीएअंतर्गत नाशिक कारागृहात रवानगी
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, एमपीडीए कायद्यांतर्गत कुख्यात गुंड तुषार ऊर्फ गोट्या संतोष गोडांबेला स्थानबद्ध करून त्याची थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तुषार गोडांबे (वय १९) याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या दहशतीचा विचार करून ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी (ता. १२) त्याला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.

पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात केले होते. पोलिसांनी उल्हासनगर परिसरात सापळा रचून तुषार ऊर्फ गोट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी (ता. १७) पोलिस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे यांच्या पथकाने सर्व कायदेशीर सोपस्कार व वैद्यकीय तपासणी पूर्ण करून आरोपीला नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT