मुंबई

भरधाव कंटेनर नदीत कोसळला

CD

भरधाव कंटेनर नदीत कोसळला
तवा-चिंचपाडा पुलावर अपघात; मनुष्यहानी नाही
कासा, ता. १८ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा-चिंचपाडाला जोडणाऱ्या पुलावरून भरधाव कंटेनर नदीत कोसळला. गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईहून गुजरातकडे प्लॅस्टिक पावडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर अनियंत्रित झाल्याने थेट पुलावरून नदीत कोसळला. ज्वलनशील उत्पादने असल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग तसेच कासा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डहाणू येथील अग्निशमन दलालाही या वेळी पाचारण करण्यात आले होते. दीड तासांच्या बचावानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात नशीब बलवत्तर ठरल्याने कंटेनरचालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातानंतर पुलाची सुरक्षितता तपासण्यासाठी काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती; मात्र काहीवेळातच वाहतूक पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : आधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने मोठे पाऊल; कार्गो हबचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT