मुंबई

एमसीए क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीचा विजय

CD

एमसीए क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीचा विजय
पोयनाड, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या दोनदिवसीय कसोटी क्रिकेट स्पर्धेत हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या सामन्यात हिंगोली संघाने बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाचा आठ गडी राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बीड संघाने पहिल्या डावात १५५ धावा केल्या. श्रेयस खटाळ यांनी ८२ धावांची झुंजार खेळी केली. हिंगोलीकडून कर्णधार ओंकार मोगल यांनी पाच, तर सम्यक बागुल यांनी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात हिंगोलीने १५९ धावा करून चार धावांची आघाडी घेतली; यात सम्यक बागुल यांच्या ८२ धावा महत्त्वाच्या ठरल्या. बीडकडून कृष्ण बिडवे यांनी सहा गडी बाद केले. दुसऱ्या डावात बीडने १३३ धावांवर नऊ गडी बाद झाल्यावर डाव घोषित केला. हिंगोलीकडून ओंकार मोगल यांनी सहा बळी घेतले. १२९ धावांचे लक्ष्य हिंगोलीने केवळ दोन गडी गमावत पूर्ण केले. सलामीवीर सोहम सरगर (५८) आणि कर्णधार ओंकार मोगल (६६) यांच्या खेळीमुळे हिंगोलीला सहज विजय मिळाला.
सामन्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू पिचिका, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे तसेच प्रदीप पाटील, प्रफुल्ल टेमघरे, देवेंद्र पाटील, दिनेश सावंत, शेखर भगत व अभिषेक खातू उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषदेत ७३ पैकी ३७ जागांवर विजय! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT