मुंबई

कर भरूनही दंडाची भीती; पालिकेतील ढिसाळ कारभार उघड!

CD

कर भरूनही दंडाची भीती
पालिकेतील ढिसाळ कारभार उघड; धनादेश महिनाभर प्रलंबित
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) ः वेळेत कर भरण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या कर भरणा विभागातील ढिसाळ नियोजन आणि पर्यायी बँकेच्या दिरंगाईचा फटका थेट करदात्या नागरिकांना बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. दंड टाळण्यासाठी सुट्ट्या काढून, तासन्‌तास रांगेत उभे राहून नागरिक कर भरत आहेत, मात्र धनादेश पद्धतीने केलेले व्यवहार महिनाभर प्रलंबित राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, दंडाची टांगती तलवार नागरिकांवर लटकत आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिक सुट्ट्या काढून, तासन्‌तास रांगेत उभे राहून भरत आहेत, परंतु धनादेश पध्दतीने केलेले व्यवहार प्रलंबित राहिल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धनादेश व ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या करदात्यांना योग्य माहिती न देणे, उद्धट वर्तन करणे आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, अशा तक्रारी कर भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात सातत्याने केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रचना खेडेकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी घरपट्टीची पावती घेऊन १२ हजार रुपयांचा चेक पालिकेत जमा केला होता, मात्र १७ डिसेंबरपर्यंत चेक क्लिअर न झाल्याने यादरम्यान २० ते २२ दिवस पालिका व बँकेच्या अनेक फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वेळेवर कर भरूनही जर अशा त्रासाला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य करदात्यांनी करायचे तरी काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. बदलापूर पालिकेच्या कर भरणा विभागावर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

अखेर धनादेश जमा
सतत पाठपुरावा आणि संताप व्यक्त केल्यानंतर अखेर पालिकेचे लेखापाल विकास चव्हाण यांनी हस्तक्षेप करून धनादेश क्लिअर करून घेतला. याबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, ‘‘धनादेश बँकेत जमा करण्यात आला होता; मात्र तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला. व पुढे २० दिवसांच्या मुदतीत पालिकेच्या कर भरणा केंद्रातील दिरंगाईमुळे करदात्यांना त्रास सहन करावा लागला. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्यांचे समुपदेशन व सक्त ताकीद दिली जाईल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीला ICC कडून झाली शिक्षा! काय झालेली चूक?

Pune Cyber Fraud : ड्रेनेज दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीने ७ कोटी लुटले, पुण्यात सायबर चोरीचा नवा चक्रावणारा प्रकार समोर

Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो...! पूजा सावंतचे अदा पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या डान्सचा viral video

Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

SCROLL FOR NEXT