मुंबई

कल्याण–डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत

CD

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत
महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणातील हालचाली तीव्र होत आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगत असतानाच, दुसरीकडे विरोधी राजकारणाची नवी मांडणी आकार घेत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आमदार वरुण सरदेसाई यांनी कल्याण-डोंबिवलीत केलेला दौरा आणि मनसे नेते राजू पाटील यांच्याशी झालेली भेट ही केवळ औपचारिक घटना नसून, महापालिका राजकारणातील संभाव्य समीकरणांची नांदी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बुधवारी (ता. १७) दिवा, कल्याण-डोंबिवली परिसराचा दौरा केला. व कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला, मात्र या दौऱ्यात त्यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. ही भेट केवळ शिष्टाचारापुरती नसून, आगामी महापालिका रणधुमाळीसाठी राजकीय संकेत देणारी ठरल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वर्चस्वासाठी चुरस वाढत असताना, दुसरीकडे मनसे आणि ठाकरे गट यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच या पक्षांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर आधारित संघटनात्मक बांधणी मनसे, ठाकरे गटाकडून सुरू आहे.

चौकट
सरदेसाई यांनी सांगितले की, राजू पाटील यांची भेट झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर राज्यभरात मराठी माणसाची जी एकजूट दिसून येते, तीच ताकद कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतही उभी राहावी, ही आमची इच्छा आहे. येत्या काळात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र बसून याबाबत सविस्तर चर्चा करतील. कल्याण-डोंबिवलीत मनसेला मानणारा मतदारवर्ग मोठ्या प्रमाणावर असून, शिवसेनेचीही येथे परंपरागत ताकद आहे. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांचा दाखला देत सरदेसाई यांनी सांगितले की, दोन्ही ठाकरे बंधूंना मानणारा, प्रेम करणारा वर्ग येथे मोठ्या संख्येने आहे. एकत्र आलो, तर ही ताकद निश्चितच प्रभावीपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT