मुंबई

अमरकोर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

CD

अमरकोर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक
भांडुप, ता. १८ ः राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात भांडुप येथील अमरकोर विद्यालयाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छ व सुंदर परिसर, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या निकषांवर शाळेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सरकारतर्फे शाळेला रोख तीन लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या यशामागे संस्थेचे संस्थापक मारुती म्हात्रे यांचे मार्गदर्शन, तसेच संस्थेचे सचिव जीवन, सदस्य गावकर, शैलेजा ठाकूर, श्रीमती डिचोलकर यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मोलाचा ठरला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साकार झाले. हा सन्मान आमच्या सर्वांच्या सामूहिक कष्टांचा आहे, अशी भावना मुख्याध्यापक अजय पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT