मुंबई

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक प्रदर्शन उत्साहात संपन्न

CD

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक प्रदर्शन उत्साहात
विरार, ता. १८ (बातमीदार) : येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कौशल्यांना आणि कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमात अकरावी व बारावीच्या सुमारे १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनात विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम मूत्रपिंड (डायलिसिस), नवीकरणीय ऊर्जा आणि नदी प्रदूषण नियंत्रण यांसारख्या सामाजिक व संशोधनात्मक विषयांवरील प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या मुग्धा लेले आणि उपप्राचार्य रमेश पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. सोनिया दीक्षित, प्रणिता परेरा व शांकरी कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर, संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी व कल्पना राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT