मुंबई

मुंबई काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात.

CD

मुंबई काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९५० इच्छुकांनी आपले अर्ज पक्ष कार्यालयाकडे सादर केले आहेत. दोन दिवसांत सर्व मुलाखती घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि त्यानंतर उमेदवार निश्चित करून यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पॉलिटिकल अफेअर्स कमिटी या मुलाखती घेत आहे. यामध्ये राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, भाई जगताप, माजी आमदार मधू चव्हाण, अमरजितसिंह मनहास आदी उपस्थित होते.

मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी भावना आहे. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे; पण इंडिया आघाडीतील काही समविचारी पक्षांशी आघाडीसंदर्भात चर्चा सुरू आहे. आघाडी करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. महापालिका निवडणुकीसाठी १७०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले होते. त्यातील ९५० जणांनी अर्ज सादर केले आहेत. गुरुवारी तीन जिल्ह्यांतील व शुक्रवारी तीन जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, अशी माहिती राजहंस यांनी दिली.

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

SCROLL FOR NEXT