मुंबई

विद्यार्थी घडविण्यासाठी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा उपक्रम

CD

अभ्यासाच्या तंत्राचा प्रा. संजय घरत यांनी दिला गुरुमंत्र
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पालघर, ता. १८ : अभ्यासाची योग्य पद्धत, व्यायाम, वेळेचे नियोजन आणि दृढनिश्चय या सूत्रांचा अवलंब केल्यास विद्यार्थी जीवनात निश्चितच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन प्रा. संजय घरत यांनी केले. पालघर तालुका सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात ते बोलत होते.
लालोंडे येथील स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रा. घरत यांनी ‘अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अभ्यासासोबतच आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि संभाषण कौशल्य या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत, हे त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सातवी यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आणि कला-क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मंडळ वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. प्रणव सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भालचंद्र पाटील, सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक, मार्गदर्शक कुणाल ठाकूर आणि प्रमुख पाहुणे अ‍ॅड. प्रणय घरत यांच्यासह मनोज अधिकारी, यदुनाथ पाटील. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT