मुंबई

खारघरमध्ये प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी

CD

खारघरमध्ये प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी
सेक्टर १४ मध्ये उभारणार सुविधा, प्राणीप्रेमींमध्ये समाधान
खारघर, ता. १८ (बातमीदार) : खारघर शहरातील पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका चार कोटी रुपयांहून अधिक खर्च करून गॅस शवदाहिनी असलेली प्राण्यांसाठीची स्मशानभूमी उभारणार आहे. या निर्णयामुळे खारघरमधील प्राणीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खारघर शहरात कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक कुटुंबांमध्ये या प्राण्यांना कुटुंबातील सदस्यासारखे स्थान दिले जाते, मात्र आजार, अपघात किंवा वयोमानामुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारासाठी शहरात स्वतंत्र सुविधा नव्हती. त्यामुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, तर काही वेळा मोकळ्या जागांवर मृत प्राणी टाकले जात असल्याने दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत होती.
पालिकेने खारघर सेक्टर १४, भूखंड क्रमांक १३ येथे ४०२.८८ चौरस मीटर जागेवर सुमारे चार कोटी सहा लाख रुपये खर्चून गॅस शवदाहिनी असलेली स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. या सुविधेमुळे मुक्या प्राण्यांचे सन्मानपूर्वक अंत्यविधी करता येणार असून शहरातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास प्राणीप्रेमी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT