मुंबई

मुख्यमंत्र्यांनी थेट टीका केली असती, तर उत्तर द्यायला आम्ही समर्थ होतो – गोपाळ लांडगे

CD

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर द्यायला आम्ही समर्थ ः गोपाळ लांडगे
अंबरनाथ ता. १८ (वार्ताहर) ः अंबरनाथची निवडणूक रडीचा डाव खेळून ही पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी करत भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात, मुख्यमंत्र्यांनी थेट टीका केली असती, तर त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे समर्थ होतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी लांडगे म्हणाले की, निवडणूक पुढे ढकलण्यापूर्वी अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा झाल्या होत्या. त्यामुळे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, गुरुवारच्या (ता. १८) सभेमुळे तो आणखी वाढला आहे. ज्या-ज्या ठिकाणी साहेबांनी प्रत्यक्ष लक्ष घातले, त्या-त्या ठिकाणी शिवसेनेला निश्चितच यश मिळाले आहे. गेली २५ वर्षे अंबरनाथकरांनी शिवसेनेला साथ दिली आहे आणि यावेळीही ती साथ कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांचा विकास हाच अजेंडा असून जे बोलले ते करून दाखवणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी ते अधिक प्रयत्न करतील आणि आजची सभा निश्चितच यशस्वी ठरेल, असा दावा लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT