मुंबई

मुरबाडमध्ये रेल्वे धावणार?

CD

मुरबाडमध्ये रेल्वे धावणार?
प्रारूप विकास योजनेच्या नकाशात स्थानकासाठी जागा राखीव

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये मुरबाड शहराची प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप विकास योजनेच्या नकाशात मुरबाड शहरात रेल्वे स्थानकासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुरबाडला भविष्यात रेल्वे येणारच, असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर रेल्वे लाइनला क्रॉस करण्यासाठी माळी पाडा भागात एक ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे. मोठा तलाव परिसरात आणखी एक ओव्हर ब्रिज व एक अंडरपास बांधण्यात येणार आहे. मोठा तलाव परिसरातच मुरबाड रेल्वे स्थानकसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. ही रेल्वे लाइन मुरबाड शहराच्या हद्दीपर्यंतच असल्याचे नकाशात दर्शविण्यात आले आहे.

प्रारूप विकास योजनेच्या नकाशात मुरबाड नगर पंचायत हद्दीतून जाणारा कल्याण-मुरबाड-माळशेज घाट महामार्ग रस्त्याची प्रस्तावित रुंदी तब्बल ६० मीटर म्हणजे २०० फूट दर्शविण्यात आली आहे. शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत राष्ट्रीय महामार्गाची रुंदी ४५ मीटर म्हणजे १५० फूट, तर शहराच्या सीमेच्या हद्दी जवळून जाणाऱ्या अर्ध वर्तुळाकार रस्त्याची रुंदी ३० मीटर म्हणजे १०० फूट दर्शविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात १० डिसेंबरला मुरबाड शहराची प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेसंबंधी नकाशे व अहवाल मुख्याधिकारी मुरबाड नगर पंचायत मुरबाड व सहाय्यक संचालक नगररचना विभाग ठाणे शाखा ठाणे यांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे.
प्रारूप विकास योजनेबाबत जनतेच्या काही सूचना हरकती असतील, तर योजना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मुख्याधिकारी मुरबाड नगर पंचायत यांच्याकडे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुरबाड शहरासाठी प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी २०१७ मध्ये मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ ते राम मंदिर या रस्त्याची प्रस्तावित रुंदी ३८ फूट दर्शविण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२६ नुसार मे २०१९ मध्ये या रस्त्यावरील मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर जून २०१९ मध्ये मुरबाड शहरासाठी प्रारूप विकास योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तीन हात नाका ते राम मंदिर म्हसा रोडपर्यंतचा रस्ता १५ मीटर म्हणजे ५० फूट रुंदीचा दर्शविण्यात आला होता. तेवढीच रुंदी प्रारूप विकास योजनेत दर्शविण्यात आली आहे.


अनेक घरे होणार बाधित
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मुरबाड बस स्थानक ते राम मंदिरपर्यंत जाणारा रस्ता १५ मीटर म्हणजे ५० फूट प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सुमारे १०० अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर तोडक कारवाई होण्याची शक्यता आहे. या मुख्य रस्त्यामध्ये येणारी अनेक घरे व दुकाने रस्ता रुंदीकरणात बाधित होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT