मुंबई

अवैध लोखंडी सळई अपहार प्रकरणी अटक

CD

अवैध लोखंडी सळई
अपहारप्रकरणी अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : अवैद्यरीत्या लोखंडी सळईचा विक्रीसाठी अपहार करणाऱ्या शाहनवाज निजाम शेख (३६) व सर्फराज ऊर्फ असलम गफार शेख (३५) या दुकलीला ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशिंद युनिटने अटक केली आहे. तसेच त्या दुकलीकडून ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिल्यानंतर सोमवारी (ता. १५) स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण अंतर्गत वाशिंद युनिटचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनूसार कांबारेगाव (ता. शहापूर) येथे पॉवर हाउससमोरील बंद बंगल्यालगत महामार्गावरून लोखंडी सळई वाहतूक करणाऱ्या ट्रेलरमधील माल काही इसमांद्वारे काढून त्याचा अपहार करून विक्री करत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार, पथकाने तेथे छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत ३२ हजार ८०० किलो वजनाची लोखंडी सळई तसेच ट्रेलर असा एकूण ३४,०२,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहनवाज व सर्फराज या दोघांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कदम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT