मुंबई

अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

CD

अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मद्यपान करून लोकलने प्रवास करणाऱ्या उल्हासनगर येथील फोटोग्राफरला प्रवास चांगलाच महागात पडला आहे. या लोकल प्रवासात त्याचा अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर येथील पवन आउजी (२६) यांनी दिलेल्या तक्रारीत, ते मिरा रोड येथे छायाचित्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रात्री सुमारे ११.३० वाजता मिरा रोड रेल्वे स्थानकावरून निघाल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांनी दादर सेंट्रल रेल्वे स्थानकावरून बदलापूरकरिता धीम्या लोकलने प्रवास सुरू केला. त्यांनी फोटोग्राफीचे साहित्य असलेली बॅग लोकलमधील रॅकवर ठेवली होती. नाहूर स्थानकात लोकल थांबली असताना ते लघुशंकेसाठी खाली उतरले आणि पुन्हा लोकलमधे बसले. दिवा रेल्वे स्थानकावर रात्री सुमारे १.२५ वाजता उतरताना रॅकवर ठेवलेली सॅकबॅग तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या सॅकबॅगमध्ये सुमारे दोन लाख ३९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. यामध्ये कॅमेरा, दोन वेगवेगळ्या कंपनीच्या लेन्स, दोन फ्लॅश, मेमरी कार्ड्स, कॅमेरा बॅटऱ्या, फ्लॅश सेल, कॅमेरा बेल्ट व चार्जर आदी साहित्याचा समावेश आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT