मुंबई

घणसोलीत मध्यरात्री घरामध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग,

CD

घरामध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग
घणसोली गुन्हे शाखेने अल्पवयीन तरुणाला घेतले ताब्यात

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : घणसोली परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने गुरुवारी (ता. १८) पहाटे २ च्या सुमारासास घणसोलीतील एका २२ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पळून गेलेल्या सदर अल्पवयीन तरुणाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
प्रकरणातील पीडित तरुणी घणसोलीत एकटीच वास्तव्यास असून, गुरुवारी (ता. ८) पहाटे घणसोलीतील अल्पवयीन तरुणाने पीडित तरुणीच्या घराच्या खिडकीच्या काचा काढून तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने गाढ झोपेत असलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडित तरुणीने आरडा-ओरड करून त्याला विरोध केला असता, अल्पवयीन तरुणाने पीडित तरुणीला शिवीगाळ व धक्काबुक्की करून तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने घराचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर पळ काढल्यानंतर त्याने बाहेरून दरवाजा बंद करून पलायन केले.
रबाळे पोलिसांच्या प्राथमिक तपासात अल्पवयीन तरुणाने पीडित तरुणीच्या घरात घुसून नुकसान केल्याचे तसेच पीडित तरुणीवर अतिप्रसंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सदर अल्पवयीन तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट १, २ व मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर तरुणाचा शोध घेत त्याला सकाळी घणसोलीतील उड्डाणपुलाखालून ताब्यात घेतले. तपासात सदर तरुण हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी भिवंडी येथील बालन्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT