मुंबई

आमदार राम कदम यांनी पाच वर्षांनंतर कापले केस

CD

आमदार राम कदम यांनी
पाच वर्षांनंतर कापले केस
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार)ः घाटकोपर, विक्रोळी, पार्कसाईट परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटेपर्यंत केस कापणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या आमदार राम कदम यांनी अखेर पाच वर्षांनंतर केस कापले. वर्षानगर येथे नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी केस कापत दिलेल्या शब्दाची पूर्तता केली.
घाटकोपर, विक्रोळी, पार्कसाईट परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपूर्वी कदम यांनी, या परिसरातील पाणीप्रश्न सुटणार नाही, तोवर डोक्यावरचा एकही केस कापणार नाही, अशी जाहीर प्रतिज्ञा केली होती. पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते आनंदगड येथील पाण्याच्या टाकीची क्षमता वाढविण्यासाठी भूमीपूजन नुकतेच झाले होते. आज बांधकामाचे पूजन आमदार कदम यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर कदम यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करत डोक्यावरील केस कापले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

SCROLL FOR NEXT