मुंबई

निवडणूकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार

CD

निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार : पातकर
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष हा पालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली निवडणूक रणनीती स्पष्ट केली. याप्रसंगी प्रभारी राजन भोसलेदेखील उपस्थित होते.
महाविकास आघाडी पक्षातील घटक पक्षांची एकत्रित निवडणूक लढण्यासाठी जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. जागावाटपात आमच्या पक्षाला किती जागा मिळतात, त्यावरून त्या जागा लढविल्या जातील. आघाडी झाली नाही तर आम्ही सर्व १२२ जागांवर निवडणूक लढवू, अशा निर्धार राजाभाऊ पातकर यांनी केला आहे.
​राजाभाऊ पातकर म्हणाले, की पक्षाने अनेक पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या आणि अधिकार दिले, परंतु काही व्यक्तींनी वैयक्तिक कारणास्तव पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्ष नेहमी कार्यकर्त्यांपेक्षा मोठा असतो. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे कोणतेही नुकसान होणार नाही.
काँग्रेस आगामी निवडणुकीत सर्व ३१ पॅनेलवर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. सध्याचे वातावरण काँग्रेससाठी अनुकूल होत आहे. आमच्या १२२ उमेदवारांच्या विजयासाठी सातत्याने रणनीतीवर काम करीत आहोत. भाजपचे अनेक इच्छुक उमेदवारही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्कात असून रांगेत उभे आहेत, असे राजन भोसले यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या व माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांनी सांगितले, की काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा राखेतून भरारी मारण्यासाठी जोमाने पक्ष बांधणी करून संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. सचिन पोटे यांनी पक्षाची नासाडी केली. त्यांनी कोणालाही पुढे येऊ दिले नाही. ते शिंदे सेनेत गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

मालिकेने निरोप घेताच नवी सुरुवात; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई; ग्रहमखचे फोटो व्हायरल

Raj Thackeray Eknath Shinde Meeting : राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राज्याच्या राजकारणात नवे समीकरण ? चर्चांना उधाण

PM Internship Scheme: PM इंटर्नशिप योजनेत मोठे बदल? विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार; जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT